गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या #chandrapur #Rajura

Bhairav Diwase
0

🎆
राजुरा:- शेतीत होणारी सततची नापिकी आणि कर्जबाजारी पणाला कंटाळून नवेगाव येथील देवराव यादव दिवसे, वय 59 यांनी बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास स्वतःच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांना सुसाईड नोट मिळाली असून त्यात कर्जापोटी आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख आहे.

🎆
राजुरा तालुक्यातील नवेगाव येथील देवराव दिवसे यांच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यांना तीन मुली असून पत्नी गेल्यानंतर त्यांनी मुलींचे संगोपन व्यवस्थित केले. त्यांचेकडे पाच एकर शेती असून कष्ट करून देवराव आपल्या कुटुंबाचा गाडा चालवीत होते. काही वर्षापुर्वी त्यांनी मुलींचे लग्न केले. परंतु मागील तीन वर्षापासून सततच्या नापिकीमुळे ते कर्जबाजारी झाले होते. अखेर कर्जामुळे त्रस्त होऊन बुधवारी रात्री देवराव दिवसे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
🎆

प्राप्त माहितीनुसार त्यांच्यावर बँक ऑफ इंडिया, शाखा विरुर चे पिक कर्ज एक लाख वीस हजार रुपये असल्याची माहिती मिळाली. मृत शेतकर्‍याच्या खिशात एक सुसाईड नोट मिळाली असून सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून मी स्वतः आत्महत्या करित आहे, असे त्यात लिहून ठेवले आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जयप्रकाश निर्मल, पोलीस हवालदार देवाजी टेकाम, पोलीस शिपाई अशोक मडावी करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)