Click Here...👇👇👇

राज्याच्या सांस्कृतिक मंत्रीकडून योगनृत्य परीवार महिला शक्तीचा सन्मान chandrapur

Bhairav Diwase
चंद्रपूर:- दि. ५ जुलै २०२३ रोजी पार पडलेल्या शहरातील (राम सेतु) दाताला पुल च्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री तसेच चंद्रपूर जिल्हाचे पालकमंत्री श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे हस्ते चंद्रपूर मधे उगम झालेल्या योगनृत्य या व्यायाम प्रकारातील महिला शक्तीचा सन्मान करण्यात आले.


मंत्री मुनगंटीवार यांच्या मदतीने जागतिक योग दिवस २१ जून ला योगनृत्य परिवाराचा एक चमू गोवा येथील सांस्कृतिक महाविद्यालयात योग्नृत्यचे सादरीकरण आणि प्रशिक्षण साठी चंद्रपूर वरून पाठविण्यात आला होता. योगनृत्य परीवार चंद्रपूर आणि चंद्रपूर शहराच्या बाहेर दृगद गतीने वाढत आहे आणि नागरिक आरोग्याचा लाभ घेत आहे. जवळपास ८०% महीला आज योग्नृत्य परिवाराचा भाग आहेत, त्यामुळे राहुल भाऊ पावडे यांनी हा विशेष कार्यक्रम घडवून आणला.

या प्रसंगी सुधीर भाऊ यांनी वचन दिले की योगनृत्य ही चंद्रपूर शहराची, आदरणीय जनक गोपालजी मुंदडा यांचा परिश्रमातून तयार झालेली, चंद्रपूर जिल्हाच शिरपेचात मानाचा तुरा लावणारी संकल्पना आहे, यांनी याचा प्रसार भारत भर लोकांच्या स्वस्था साठी आरोग्यासाठी प्रचार करण्यास प्रयत्न करणार.
या कार्यक्रमाचे आयोजन श्री राहुलभाऊ पावडे आणि सहहाय करण्यात श्रीमती मुग्धा खांडे, मंगेश खोब्रागडे, प्रमोद बाविस्कर, संगीता सिरसागर, प्रियांका जोगी, दिलीप पुण्यापवार आणि ईतर होते