Click Here...👇👇👇

माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिवसा निमित्त ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे फळ वाटप कार्यक्रम #chandrapur #nagbeed

Bhairav Diwase

नागभीड:- माजी राज्यमंञी बच्चु कडु यांच्या वाढदिवसाच्या निमीत्याने ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. प्रहार जनशक्ती पक्ष नागभीडच्या वतीने ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे रुग्णांना फळ वाटप करुण माजी राज्यमंञी बच्चु कडु यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी ग्रामीण रुग्णालय नागभीडचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गावंडे उपस्थित होते. यावेळी रुग्णाची विचारपुस करण्यात आली.योग्य उपचार, रुग्णाना जेवन मीळतो की नाही या बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी नागभीड तालुक्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष वृषभ खापर्डे, नागभीड शहर संघटक म्हणून सुरेश कोल्हे, नागभीड शहराध्यक्ष नानक नाकाडे, नागभीड तालुका युवक अध्यक्ष पप्पू देशमुख, नागभीड शहर युवक अध्यक्ष प्रमोद सुरपाम, नागभीड तालुका विद्यार्थी प्रमुख नागेश कावडे, नागभीड शहर उपाध्यक्ष दिगंबर कंनकावार , प्रवेश बगडे , जयेंद्र भांडारकर, आकाश चौधरी, नवखळा शाखाप्रमुख गौरव जांभुळे हे सर्व उपस्थित होते.नाही