गोंडपिपरी-आक्सापूर मार्गावर सुरक्षा रक्षक नेमणूक करा, शिवसेनेची मागणी #chandrapur #gondpipari


मागणी पूर्ण न झाल्यास १९ जुलैला उतरणार शिवसैनिक रस्त्यावर
गोंडपिपरी:- कोंसरी व सुरजागड येथील लोहखनिज घेऊन जाणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ चालली आहे.ही वाहतूक गोंडपिपरी तालुक्यातून दिवसरात्र सुरू आहे.अधिक प्रमाणात हायवा गोंडपिपरी तालुक्यातील धानापूर, करंजी, आक्सापूर, जोगापूर येथील मुख्य मार्गावर पार्किंग करून असतात.सोबतच अनेक शाळा या रस्त्यालगत असल्याने विध्यार्थी देखील असुरक्षित आहे.त्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीसंदर्भात कुठलीच शिस्त राहिली नाही.सदर परिसरात वाहनधारकावर नियंत्रण नाही.त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली असून नागरिकांचे जीव सुध्दा धोक्यात असल्याचे बघायला मिळत आहे.करिता धानापूर ते आक्सापूर मार्गावरील अनियंत्रित वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दिवसा व रात्र पाळी असे त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमावे अशी मागणी ठाणेदार जीवन राजगुरू यांना दिलेल्या निवेदनातून व तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

मागणी पूर्ण न झाल्यास मागणीच्या पुर्तेतेसाठी १९ जुलै २०२३ रोजी गोंडपिपरी तालुक्यातील अहेरी-चंद्रपूर या राष्ट्रीय महामार्गावर जोगापूर मुख्य मार्गावर शिवसेना तालुका पक्ष गोंडपिपरी तर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल.असा इशारा उबाठा तालुका प्रमुख सुरज माडुरवार यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या