बल्लारपुर:- बल्लारपूर शहरातील शशी डेव्हलपर्स आणि प्रॉपर्टी डीलर्स चे संचालक यांना गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास गोल पुलियाजवळ दुचाकीवरील तीन मुखवटा घातलेले तरुण (चेहऱ्यावर स्कार्फ बांधलेले) त्यांच्या मागून बंदुकीसारखी वस्तू काढताना दिसले. हे पाहुन मनमोहन सिंग गुरदयाल सिंग दिगवा आणि त्रिलोकचंद्र सिंग दिगवा यांनी त्यांच्या बुलेट मोटर सायकलचा वेग वाढवून आपले प्राण वाचवले.
अज्ञात तरुणांनी त्यांचा दुचाकीवरून बस्ती मध्ये स्थित गांधी पुतळ्यापर्यंत पाठलाग करून पुन्हा गोळ्या घालण्याची धमकी दिली. या घटनेची फिर्याद बल्लारपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
तक्रारदाराने सांगितले की, 1 जुलै रोजी विरूर येथेही असाच प्रकार घडला होता, त्यानंतर विरूर पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती दिल्यानंतर ठाणेदारच्या मदतीने दिग्वा बंधूंना राजुरापर्यंत पोलीस संरक्षणात पाठविण्यात आले.
13 जुलैच्या रात्रीही अशीच घटना घडली आहे. अज्ञात शत्रूच्या या प्रकारामुळे संपूर्ण दिगवा परिवार दहशतीत आहे. दिग्वा कुटुंबीयांनी पोलीस प्रशासनाला सुरक्षा पुरवण्याचे विनंती केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक उमेश पाटिल यांचा मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक रमेश हत्तीगोटे करीत आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत