Top News

मानवसेवेतच खऱ्या ईश्वरप्राप्तीचा आनंद:- माजी मंत्री आ. वडेट्टीवार #chandrapur


कॅन्सर निदान अद्यावत वाहनाच्या लोकार्पण सोहळा संपन्न

चंद्रपूर:- राजकारण म्हणजे जनतेची सेवा करण्याकरिता मिळालेली जबाबदारीची संधी होय. एक सच्चा जनप्रतिनिधी म्हणून कार्य करत असताना निवडून देणाऱ्या मतदारांचे ऋण फेडण्याकरिता क्षेत्र विकासासह प्रत्येक मूलभूत समस्यासह आरोग्य रक्षणाची जबाबदारी देखील लोकप्रतिनिधीवर असते. राजकारणात संधी साधूंनी स्वार्थ साधले मात्र आपण जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहून मतदारसंघातील हजारोंच्यावर नागरिकांना कर्करोग या महाभयंकर प्राणघातक रोगांपासून लढण्यास सहकार्य केले. ही सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली. हे माझे अहोभाग्यच. मानवरुपी देवताची सेवा करणे हीच खरी ईश्वर सेवा असून मानवसेवेतच खऱ्या ईश्वर प्राप्तीचा आनंद मिळतो असे प्रतिपादन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. ते चंद्रपूर महानगरपालिका पटांगणात विजयकिरण फाउंडेशन च्या वतीने कर्करोगाचे (कॅन्सर) निदान करण्याकरिता फिरते कर्करोग (कॅन्सर) रुग्णालय असलेल्या ॲम्ब्युलन्सचा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलत होते.



पुढे बोलताना आ. वडेट्टीवार म्हणाले, सर्व सुविधायुक्त असलेली ही गाडी फ्री चेक अप साठी राहणार आहे. या गाडीतच फर्स्ट ट्रीटमेंट, बॉडी स्कॅनिंग होणार आहे. संपूर्ण सोयी संयुक्त कॅन्सर गाडी चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकासाठी उपलब्ध होत आहे. ही गाडी आरोग्य कॅम्प जिथे असतील तिथे पाठवली जाईल. जिल्ह्यात वाढते कॅन्सरचे प्रमाण लक्षात घेता आपण या गाडीची व्यवस्था केली आहे. फर्स्ट स्टेजवर असलेल्या कॅन्सर रुग्णाला, डिटेक्ट होणे या गाडीचा फायदा होईल.

कार्यक्रमाला कॉग्रेसचे नेते, पदाधिकारी, युवक, युवती पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने