चंद्रपूर जिल्ह्यात दहा किलो गांजा सह‌ आरोपी अटकेत #chandrapur #warora

वरोरा:- वरोरा येथील शासकीय विश्राम गृह असलेल्या परिसरात एक व्यक्ती गांजाची तस्करी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी नरेश शंकर नलवडे वय 41 वर्ष रा. चंद्रपूर यास रात्री साडे अकराच्या सुमारास अटक करीत त्याच्या जवळून दहा किलो गांजा पोलिसांनी हस्तगत केला. त्याची किंमत अंदाजे 1 लाख दोन हजार सहाशे चाळीस असल्याचे पोलिसांनी सांगितले.


दि. १४ जुलैला रात्रौच्या सुमारास चंद्रपूर-नागपूर महामार्गावर असलेल्या शासकीय विश्राम गृह रोडवर नरेश नलवडे हा इसम एका निळ्या बागेमध्ये गांजा भरून नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेऊन त्या जवळील असलेल्या निळ्या बागेची तपासणी केली असता त्यामध्ये प्लास्टिकच्या बंडलमध्ये गांजा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी जप्त केलेल्या गांजाची मोजणी केली असता सदर गांजा 10 किलो 264 ग्राम भरला. ही कारवाई वरोरा पोलीस स्टेशन, माजरी पोलीस स्टेशन, चंद्रपूर येथील पोलीस पथक यांनी संयुक्तरीत्या केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत