नगराध्यक्षांने वाटले सफाई कामगारांना रेनकोट #chandrapur #pombhurna

Bhairav Diwase

नगराध्यक्षा सुलभा पिपरे यांचा अनोखा उपक्रम
पोंभूर्णा:- महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतिक, मत्स्य व्यवसाय, चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त पोंभुर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात भव्य शिबिराचे आयोजन दिनांक 30. 07.2023 रोजी करण्यात आले होते.

नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. सुलभा गुरुदास पिपरे यांनी पावसाळ्याच्या दिवसात अती आवश्यक सेवा देणारे स्थानिक नगर पंचायत पोंभूर्णा येथील सफाई कामगारांना रेनकोट देऊन ना सुधीर भाऊंचा वाढदिवस साजरा केला.

दिवस रात्र सर्व ऋतूमध्ये शहरातील परिसरातील स्वच्छतेसाठी राबणारे सफाई कर्मचाऱ्यांची काळजी घेणे आपली जबाबदारी आहे. भर पावसात काम करीत असताना त्यांची पावसापासून सुरक्षा व्हावी. यासाठी आपली जबादारी ओळखुन घनकचरा व्यवस्थापनावर काम करणाऱ्या सफाई कामगारांना त्यांनी रेनकोट चे वाटप केले. यावेळी सफाई कर्मचार्यांनी नगराध्यक्षा सुलभाताई पीपरे यांचे धन्यवाद मानले.

याप्रसंगी न. प. च्य्या सभापती आकाशी गेडाम, सभापती रोहिणी ढोले, उपसभापती उषा गोरंतवार, शारदा गुरुनुले तसेच सफाई कर्मचारी उपस्थित होते.