Top News

हसतमुखी स्वभावाचा उमदा पत्रकार दिलीप मॅकलवार #chandrapur #pombhurna


दिलीप मॅकलवार पोंभूर्णा तालुक्यातील पत्रकार व शिक्षक क्षेत्रातील नावाजलेलं नाव.ते एक उत्तम शिक्षक, उमदा पत्रकार, आयुष्य बिनधास्त जगणारा ट्रव्हलर, सामाजिक समस्यांसाठी झटणारा सोशालिस्ट,राजकीय क्षेत्रातील उमदा जाणकार अशी त्यांची ओळख आहे. आनंदाने आयुष्य जगणारा,शांत, सुस्वभावी, मनमिळाऊ अशी हि त्यांची एक वेगळी ख्याती आहे.आणि त्यातही त्याच्या ओठावर नेहमीच हसू ठेवणारा माणूस.आजच्या घडीला तरी आपल्या ओठावर नेहमीच हसू ठेवणारा माणूस क्वचितच सापडत असतो.पण त्या क्वचित मध्ये दिलीप मॅकलवार हे नाव नक्कीच घेता येईल.मस्त हरफन मौला आयुष्य हा माणूस जगतो.त्याची दिनचर्या आजतागायत सारखीच आहे.तो मित्रांमध्ये राहतो,मित्रांसाठी तो वेळ काढतो,त्याचे मित्र म्हणजे त्याचे जीव की प्राणच.कुणाच्याही सुखा दुखात तो हजर असतो.आणि म्हणूनच प्राथमिक शाळेतील वर्ग मित्रही त्यांच्या काॅन्टॅक्ट मध्ये आहेत.आणि त्यांच्या भेटीगाठी आजही होत असतात.मैत्रीच्या दुनियेत त्यांनी आपली वेगळी छाप सोडली आहे.
दिलीप मॅकलवार हे नाव पत्रकार क्षेत्र सन्माननीय नाव आहे.खरं तर त्यांच्या निर्भिड बातम्या हि त्यांची ओळख.ते बातमीला महत्व देतात.त्यांनी अनेक बातम्या निडरपणे दिले आहेत.अनेक बातम्यांतून त्यांनी प्रशासनाला वास्तविकतेची ओळख करून दिली आहे.ते पत्रकार आहेत म्हणून सर्वच पत्रकारांशी सौजन्याने ते वागतात.कोणत्याही गटा तटात ते अडकून न राहता त्यांनी पत्रकारांच्या हितासाठीच प्रयत्न केले आहेत.पुढेही पत्रकारांच्या हितासाठी त्यांचा
सहभाग राहणार आहे यात शंका नाही.
सामाजिक क्षेत्रातील त्यांचं काम ते अतीशय चांगल्या प्रकारे करीत आहे. गोल्ला,गोलकर,गोल्लेवार,यादव समाज संघटना चंद्रपूर जिल्ह्याचे ते जिल्हा उपाध्यक्ष आहेत.समाजाच्या हितासाठी त्यांनी समाजासाठी अनेक कार्यक्रमात त्यांचा सहभाग राहिला आहे.समाजाला जागृत करण्याचे काम ते करीत आहेत.समाजाची सांस्कृतीक इतिहासाची माहिती सर्वदुर व्हावी व त्याची महती आजच्या पिढीला कळावी यासाठी ते समाज संघटनेच्या माध्यमातून व्यापक काम करीत आहेत.अनेक गरजूंना मदत करतात.अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मदत केली आहे.त्यांच्या हातून शिक्षण घेतलेले काही विद्यार्थी मोठ्या पदावर राहून सेवा देत आहेत.दिलीप मॅकलवार नेहमीच म्हणतात की माझ्या विद्यार्थ्यांनी दिलेला हाच मोठा सन्मान आहे.
मॅकलवार सर एवढ्यातच थांबले नाही त्यांनी राजकारणात प्रवेश केला.आणि केवळ आणि केवळ सुधीर मुनगंटीवार यांच्या कामाने ते प्रेरीत होऊन भारतीय जनता पार्टीत सामील झाले.भाजपाने दिलीप मॅकलवार यांना तालुका प्रसिद्धी प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली.ते मागील अनेक वर्षांपासून या पदाला प्रामाणिक न्याय दिला आहे.त्यांना सुधीर मुनगंटीवार यांच्या बद्दल खुप आस्था आहे.राजकारणात काम करतांना कधी कधी हिरमोड होतोच.काही तरी कारणाने ते राजकारणापासून थोडे दुर झाले खरे पण भाजपाशी जी नाड जुळली होती ती थोडीच तुटणार होती.पुन्हा त्यांनी भाजपात जोरकस काम सुरू केले.
दिलीप मॅकलवार सर हे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद या संघटनेशी जुळून शिक्षक,त्यांच्या मागण्या,त्यांचा लढा यात सक्रिय योगदान देत राहिले.शिक्षकांच्या समस्यांचे निराकरण करणाऱ्या यज्ञकुंडासाठी ते नेहमीच पुढाकार घेत हवन चेतवत लढा देत राहिले.या त्यांच्या निस्वार्थ सेवेची थाप म्हणून आता नुकताच वाढदिवसाच्या एक दिवसा अगोदर २९ जुलैला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा चंद्रपूर जिल्हा कार्यवाह या पदावर त्यांची निवड झाली.खरं तर हे २० वर्ष भगिरथा सारखं तपश्चर्या केलेल्या साधनेचा फळ आहे. 
मॅकलवार सर,योग प्रशिक्षणाशी जुळलेले आहेत.ते नियमित योग करतात.त्यांना फिरण्याचा छंद आहे.वेळ मिळाला की ते वेगवेगळ्या ऐतिहासिक व निसर्गरम्य स्थळांना भेट देतात.फिरण्याची त्यांची आवड हि छंद म्हणून जोपासतात.ते निसर्गप्रेमी आहेत.हा छंद,हि आवड ते नेहमीच जोपासावे.

दिलीप मॅकलवार हे ५५ वी वर्षगाठ पार करीत आहेत.याही वयात ते तरूणांना लाजवतील अशी त्यांची काम करण्याची एनर्जी आहे.कधीही चेहऱ्यावर हसू.कुणाच्याही चांगल्या कामाला दाद देत 'गुड'शब्दाची थाप देणारे एव्हर ग्रीन व्यक्तीमत्व दिलीप मॅकलवार यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा...!!

-सुरज गोरंतवार,पोंभूर्णा

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने