Top News

सरदार पटेल महाविद्यालयाचे माजी प्राचार्य धनकर यांचे निधन #chandrapurचंद्रपूर:- सरदार पटेल महाविद्यालयाचे माजी प्राचार्य मदनराव धनकर यांचे रविवार, 30 जुलै रोजी दुपारी 1 वाजून 45 मिनिटांनी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंड व बराच मोठा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा सोमवार, 31 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजता त्यांच्या विद्यानगर, चंद्रपूर येथील राहत्या घरुन निघेल.

चंद्रपूरच्या साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचे कार्य फार मोठे आहे. येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची पालखी त्यांनी वाहिली होती. त्यांच्या नेतृत्वात हे संमेलन यशस्वीरित्या पार पडले. शांताराम पोटदुखे यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून त्यांनी येथील शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्राला वेगळी उंची प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने