घनोटी नं.२, देवई, सातारा भोसले येथील लाभार्थ्यांना ई-रिक्षाचा लाभ #chandrapur #pombhurna

Bhairav Diwase
0

माजी जि. प. सदस्य राहुल संतोषवार यांचा पुढाकार
पोंभुर्णा:- ना. सुधीर मुनगंटीवार, मंत्री, वने, सांस्कृतिक कार्य, मस्त्यव्यवसाय महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार हे अविरतपणे जनसेवेचे कार्य करीत आहेत. राहुल संतोषवार यांनी घनोटी नं.२, येथील लाभार्थी मंसराम घुलाराम कोडापे, देवई येथील लाभार्थी अविनाश त्र्यंबक आलाम, सातारा भोसले येथील संजय देवाजी तोडासे यांना ई-रिक्षाचा लाभ मिळवून देण्यात आले.


राहुल संतोषवार हे जिल्हा परिषद सदस्य असतांना जिल्हा परिषद चंद्रपूर समाजकल्याण विभागामार्फत 75 टक्के अनुदानावर पोंभूर्णा तालुक्यात काही लाभार्थी मंजूर करण्यात आले होते. त्या मंजूर लाभार्थी पैकी घनोटी नं.2 व देवई येथील लाभार्थी यांना या वर्षी योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला. ई-रिक्षाच्या माध्यमातून रोजगाराची समस्या दूर होणार आहे. देवई सारख्या आदिवासी बहुविपुल जंगलाने वेढलेल्या गावामध्ये ई-रिक्षा आल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंसराम कोडापे, अविनाश आलाम तसेच संजय तोडासे यांना ई रिक्षा मुळे रोजगार मिळाल्याने त्यांनी ना. सुधीर मुनगंटीवार, मंत्री, वने, सांस्कृतिक कार्य, मस्त्यव्यवसाय महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री चंद्रपूर यांचे आभार मानले. यावेळी उपस्थित भाजपचे नानाजी टेकाम, ग्रा.पं.सदस्य पवन गेडाम, ग्रा. प. सदस्य यशवंत ढोंगे, लक्ष्मण गव्हारे व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)