गुराखी युवकाचा नदीत बुडून मृत्यू #chandrapur #Bhadrawati

Bhairav Diwase
0

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- नदीत गेलेल्या म्हशी बाहेर काढण्यासाठी पाण्यात उतरलेल्या एका गुराखी युवकाचा अचानक नदीत पाण्याचा लोंढा आल्यामुळे बुडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील पिपरी येथील वर्धा नदी घाटावर दि.५ जुलै रोजी बुधवारला सायंकाळच्या सुमारास घडली.
अंकुश खेडेकर (२०) रा. पिपरी असे मृतक गुराख्याचे नाव असून तो बुधवारी म्हशी चरायला घेऊन गेला होता. म्हशी चरत असताना त्या नदीच्या पाण्यात उतरल्या. त्यांना बाहेर काढण्यासाठी तोसुद्धा पाण्यात उतरला. मात्र तेवढ्यात पाण्याचा मोठा लोंढा आल्याने त्यात तो बुडाला. त्याचा शोध घेतला असता दि.६ जुलै रोजी सकाळी ८ वाजता त्याचे प्रेत आढळून आले.

अंकुश हा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. मूळचे चामोर्शी तालुक्यातील चाकल पेठ येथील खेडेकर कुटुंब हे अठरा वर्षांपूर्वी पिपरी येथे पोटापाण्यासाठी स्थायिक झाले होते. मृतक अंकुश हा गावातील एका शेतकऱ्याकडे गाई म्हशी चारण्यासाठी नोकरी करीत होता. आई-वडिलांचा आधार असलेल्या एकुलत्या एका मुलाचा मृत्यू झाल्यामुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)