चंद्रपूर जिल्ह्यात रेल्वेने दिली महिलेला धडक #chandrapur

Bhairav Diwase
0

चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील बाबुपेठ रेल्वे फाटक लागले असता रेल्वेरुळ ओलांडून एक वृद्ध महिला जात असताना तमिळनाडू एक्सप्रेस (१२६२१) रेल्वेची जबरदस्त धडक बसली. यात वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी ११:५० वाजताच्या सुमारास बाबुपेठजवळ खांब क्रमांक ८७९ B ९ जवळ घडली.

मंगला मारोती पारपेल्लीवार (६०) रा. बाबुपेठ, चंद्रपूर असे मृताचे नाव आहे. रेल्वेरुळ ओलांडताना साईडने येणाऱ्या रेल्वेगाडीने त्यांना जबरदस्त धडक दिली. या धडकेत मंगला पारपेल्लीवार यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)