Top News

Salaar Teaser: प्रभासच्या 'सालार' चित्रपटाचा टीझर रिलीज; KGF स्टाईल अ‍ॅक्शन अन्.... #Chandrapur #salaar #movie #entertainment


अभिनेता प्रभासचा 'सालार' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नुकतच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. प्रभासचा आगामी चित्रपट सालारचा टीझर आज 6 जुलै रोजी सकाळी 5.12 मिनिटांनी प्रदर्शित झाला आहे. प्रभासच्या 'सालार' या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 'सालार'चा अधिकृत टीझर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे.

चित्रपटाच्या टीझरमध्ये ॲक्शन पाहायला मिळते. जे मोठ्या पडद्यावर पाहणे आणखीनच रोमांचक असणार आहे. सालारचा ट्रेलर यूट्यूबवर रिलीज होताच मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे आणि ट्रेंडमध्येही आला आहे. आज प्रभासच्या चाहत्यांना सालाटच्या टीझरच्या रूपाने एक मोठी भेट मिळाली आहे.

प्रभासचा सालार हा चित्रपटही KGF दिग्दर्शक प्रशांत नील यांनी दिग्दर्शित केला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आशा आहे की यशच्या केजीएफप्रमाणेच प्रभासचा सालारही सुपरहिट असेल आहे.

प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर, प्रशांत नील दिग्दर्शित प्रभास स्टारर सालार पार्ट 1: सीझ फायरचा बहुप्रतिक्षित टीझर प्रदर्शित झाला आहे. काहीतरी वेगळं करण्याचा विचार करत निर्मात्यांनी पहाटे ५:१२ वाजता टीझरची घोषणा करून प्रेक्षकांमध्ये उत्साह वाढवला.

KGF 2 मध्ये रॉकी 5.12 मिनिटांनी समुद्रात बुडतो आणि अशा परिस्थितीत सालारचा टीझर रिलीज करणे हे दोन्ही चित्रपटांमधील संबंध दर्शवते. तर हा टीझर पाहताना तुम्हाला KGF ची आठवण होईल. चित्रपटाच्या टीझरमध्ये अॅक्शन मोडमध्ये असलेल्या प्रभासची झलक पाहायला मिळते आणि यानंतर पृथ्वीराजचा लूकही समोर आला आहे.

सालार चित्रपटात प्रभास, पृथ्वीराज सुकुमारन, श्रुती हासन, ईश्वरी राव, जगपती बाबू, श्रिया रेड्डी, टिन्नू आनंद यांच्यासह अन्य कलाकार दिसणार आहेत. प्रशांत नील दिग्दर्शित सालार हा चित्रपट 28 सप्टेंबर 2023 रोजी तेलुगू, कन्नड, मल्याळम, तमिळ आणि हिंदीसह 5 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने