"छ्त्रपती नगरचा राजा" चा पाद्यपूजन सोहळा संपन्न #chandrapurचंद्रपूर:- छ्त्रपती नगर सार्वजनिक गणेश मंडळ तुकुम चंद्रपूर, दर वर्षी प्रमाणे यंदा ही गणेश उत्सव थाटात साजरा होणार आहे . गेल्या 33 वर्षा पासून गणेश उत्सव साजरा करणारा छ्त्रपती नगर सार्वजनिक गणेश मंडळ दि. 5 जुलै 2023 रोजी संध्याकाळी 8.00 वाजता पाद्यपूजन सोहळा धार्मिक वातावरणात संपन्न झाला. राज्यात पावसाळा सुरू झाला नसला तरी पावसाळ्यातील सण- उत्सवांची तयारी मात्र सुरू झाली आहे.

यावेळी अध्यक्ष सतिश तायडे, राहुल कनकुलवार, अनिल सुरे, प्रशांत खोब्रागडे, तुषार कराडे, स्वप्निल कारेकर, निलेश भोयर, आकाश भोयर, संतोष धाबेकर, आकाश पांडव, चंदन पुणेकर तसेच मंडळातील पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत