भाजपा कामगार मोर्चा तालुका कार्यकरणी गठीत #chandrapur #Rajura

Bhairav Diwase
0

कामगार मोर्चा राजुरा तालुका महामंत्री पदी रामस्वामी रावला तर सचिव पदी कृष्णा कुंभाला यांची निवड
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा  
राजुरा:- भाजपा कामगार मोर्चाची जिल्हा बैठक वन विश्राम गृह चंद्रपूर येथे कामगार मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विजय येरगुडे यांचे उपस्थितीत बैठक पार पडली,बैठकीत कामगार मोर्चाद्वारे कामगारांचे प्रश्न तसेच कामगारा वर होणारी अडीअडचणी संदर्भात यावेळी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले,चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना सुधीर भाऊ मुनगंटीवार,ओबीसी आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज भैया अहिर,भाजपचे जिल्हा अध्यक्ष देवराव भोंगळे,माजी आमदार अँड संजय धोटे,लोकसभा विस्तारक खुशाल बोंडे,माजी आमदार सुदर्शन निमकर,यांचे मार्गदर्शनाखाली व कामगार मोर्चाचे प्रदेश महामंत्री अजय दुबे,व कामगार मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष उमेश बोढेकर यांचे सूचनेनुसार व उपस्थिती भाजपा कामगार मोर्चा तालुका राजुरा कार्यकरणी गठीत करण्यात आली.

भाजपा कामगार मोर्चा राजुरा तालुका महामंत्री पदी रामस्वामी रावला तर तालुका सचिव पदी कृष्णा कुंभाला यांची निवड करण्यात आली,तसेच संजय जयपूरकर यांची तालुका उपाध्यक्ष,दिनेश वैरागडे तालुका उपाध्यक्ष, जनार्धन निकोडे तालुका संघटन मंत्री,राजू निषाद तालुका उपाध्यक्ष,रामचंद्र घटे कोषाध्यक्ष,प्रभाकर गुंडेटी सहसचिव,रोशन लोहबळे सदस्य,दिलीप ठेंगणे यांची सदस्य पदी निवड करण्यात आली,

सर्व नवनिर्वाचित कामगार मोर्चा राजुरा कार्यकारणी मध्ये निवड झाल्याबद्दल भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे,कामगार मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष महादेव तपासे,जिल्हा सचिव योगेंद्र केवट,भाजयुमोचे जिल्हा महामंत्री मितलेश पांडे,तालुका अध्यक्ष आशिष लोणगाडगे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)