मुसळधार पावसाने चंद्रपूर शहर झाले जलमय #chandrapur

चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात १-२ पासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं जिकडे तिकडे पाणीचं पाणी झालं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक भागात नदी-नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.


चंद्रपूर शहरात मंगळवारी सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु झाला. या पावसाने शहरातील मुख्य मार्गावर 1 ते 2 फूट पाणी साचल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. शहरातील गिरनार चौक, जयंत टॉकीज चौक, आझाद गार्डन, बिनबा गेट, सरकार नगर, सिस्टर कॉलोनी, जलनगर, बंगाली कॅम्प, मार्ग व काही भाग जलमय झाला. आझाद बगीच्या परिसरातील काही दुकानात पाणी शिरल्याने दुकांनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली होती.
चंद्रपूर शहरात आज दिनांक 18 जुलै रोजी अती वृष्टी झाल्याने ( जवळ पास 195 mm पाऊस ) शहरातील सखल भाग आणि पुर प्रवण भागात रात्री पूर परिस्थिती उद्भवू शकते. तरी सर्व नागरिकांनी सतर्क राहावे आणी पाणी पातळी वाढल्यास जवळच्या महानगरपालिका शाळेत आश्रय घ्यावा.
आपत्ती प्रसंगी खालील क्रमांक वर संपर्क करावा फायर ऑफिस लैंडलाइन नंबर
07172254614
07172259406,
101
8975994277
9823107101
इशारा दिल्याचा दिनांक 18 जुलै 2023 सायंकाळी 5:30 वाजता द्वारा महानगरपालिका चंद्रपूर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत