नागपूरनंतर मुंबईत घुमला 'जय जय महाराष्ट्र...'चा आवाज! #Chandrapur #Mumbai #Maharashtra


मुंबई:- 'जय जय महाराष्ट्र माझा...' हे गीत कानावर पडताच स्फूर्ती जागृत होते, वातावरणात चैतन्य निर्माण होते. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून राज्याच्या सांस्कृतिक विभागाने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे दोन निर्णय घेतले. एक म्हणजे 'वंदे मातरम्' आणि दुसरा 'जय जय महाराष्ट्र माझा...'या गीताला राज्यगीताचा दर्जा दिला. (After Nagpur, the voice of 'Jai Jai Maharashtra...' echoed in Mumbai!)
यापूर्वी शासकीय कार्यक्रमांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी झालेली आहे आणि होत आहे. महाराष्ट्र राज्याच्या दोन्ही सभागृहांमध्ये कामकाजाची सुरुवात 'जय जय महाराष्ट्र माझा...'ने झाली. यापूर्वी नागपुरात डिसेंबर २०२२ मध्ये सभागृहात राज्यगीत लागले होते. यासाठी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रयत्न व सातत्याने पाठपुरावा केला होता.


राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून (ता. १७) प्रारंभ झाला. राज्यगीताने अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात झाली. ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकार व विशेष प्रयत्नाने महाराष्ट्राला राज्यगीत मिळाले. आता राज्याच्या सर्वोच्च विधिमंडळाच्या कामकाजाची सुरुवात राज्यगीताने होणे हा सुवर्ण योग मानला जात आहे.

महाराष्ट्राला राज्यगीत मिळावे म्हणून ना. मुनगंटीवार यांनी प्रयत्न केले. त्यातून 'जय जय महाराष्ट्र माझा' या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला. तेव्हापासून प्रत्येक शासकीय कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने करण्यात येत आहे. सोमवारी विधिमंडळाच्या कामकाजाची सुरुवातही याच राज्यगीताने करण्यात आली. ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून महाराष्ट्राला मिळालेल्या या गीताची चर्चा विधिमंडळ परिसरात होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत