सरदार पटेल महाविद्यालयात वसंतराव नाईक यांना आदरांजली #chandrapur

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयात ''शेती आणि माती''वर निस्सीम भक्ती असणारे कृषी तज्ञ व प्रगतशील शेतकरी वसंतराव नाईक यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. या निमित्ताने वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एम.काटकर यांनी माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.#SardarPatelmahavidyalayachandrapur 

कृषी दिन हा १ जुलै रोजी हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त साजरा करण्याचे महाराष्ट्र शासनाने जाहीर केले आहे. त्याच अंतर्गत सरदार पटेल महाविद्यालयाच्या ग्रंथालय परिसरात वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला माल्यार्पण आणि पुष्पांजली कार्यक्रम पार पडला. वसंतराव नाईक यांचे भारतीय राजकारण, लोकशाही सक्षमीकरण व विशेषतः कृषी औद्योगिक क्षेत्रातील क्रांतिकारी योगदानामुळे ''महानायक'' म्हणून संबोधले जात असल्याचे यावेळी प्राचार्य डॉ.काटकर यांनी नमूद केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार यांच्यासह महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. #spcollegechandrapur