चंद्रपूर जिल्हानंतर आता गडचिरोली जिल्ह्याला मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी आज राज भवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. आता धर्मरावबाबा आत्राम यांना कोणते खाते देण्यात येणार यांच्याकडे लक्ष लागले आहे.
कोण आहेत आ. धर्मरावबाबा आत्राम?
दशकापूर्वी अहेरी विधानसभेचे निर्विवाद नेतृत्व करणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी राज्यमंत्री राजे धर्मराव बाबा आत्राम.... नव्वदिच्या दशकात आमदार व राज्यमंत्री म्हणून सिरोंचा (आताचा अहेरी मतदारसंघ) विधानसभा मतदारसंघाच्या नेतृत्वाने धर्मरावबाबांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. त्यांनी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्ष, गोंडवाना गणतंत्र पार्टी ते राष्ट्रवादी कॉंग्रेस असा राजकीय प्रवास केला. राज्य मंत्रीमंडळात पंधरा वर्ष राज्यमंत्री होते.
आ. धर्मरावबाबा आत्राम यांचा राजकीय प्रवास?
2009 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा दीपक आत्राम यांनी पराभव केला. हा पराभव त्यांचे कार्यकर्ते व पक्षाला जिव्हारी लागला होता. मात्र पराभवातून खचून न जाता "बाबा' जोमाने कामाला लागले. 2012 मध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी कन्या भाग्यश्रीला गडचिरोली जिल्हापरिषद अध्यक्षपदी बसवले. त्यामुळे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत धर्मरावबाबा आत्राम पुन्हा निवडून येण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र मोदी लाटेमुळे त्यावेळीही त्यांना मतदारांनी हुलकावणी देत राजे अंब्रीशराव आत्राम यांना निवडून दिले. अंब्रीशराव आत्राम पहिल्यांदाच भाजपच्या तिकिटावर आमदार झाले आणि फडणवीस सरकार मध्ये गेली साडेचार वर्ष राज्यमंत्री व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत