सुधीरभाऊंचा परिसस्पर्श लाभला अन् मी आमदार झालो #chandrapur #pune

Bhairav Diwase
0

आ. भीमराव तापकीर यांचे भावोद्गार; वन्यप्राणी उपचार केंद्राचे उद्घाटन


पुणे:- सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास दाखवला. त्यांनी मला उमेदवारी दिली आणि जनतेच्या आशीर्वादाने मी आमदार झालो. त्यांचा परिसस्पर्श झाल्यामुळेच माझ्या आयुष्याचे सोने झाले, अशा भावना खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव अण्णा तपकीर यांनी व्यक्त केल्या.

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील बावधन वनक्षेत्र परिसरात २२एकर मध्ये वन्यप्राणी उपचार केंद्राचे उदघाटन राज्याचे वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते काल झाले त्यावेळी श्री तापकीर बोलत होते.

ते पुढे म्हणाले, सुधीरभाऊ हे राज्यातील असे नेते आहेत ज्यांना ऐकण्यासाठी माझ्यासह सर्वच राजकीय पक्षातील कार्यकर्ता उत्सुक असतो. अभ्यासपूर्ण भाषण, अचूक आकडेवारी आणि विषयाची प्रभावी मांडणी हे सुधीर मुनगंटीवार यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्याच कार्यकाळात वन्यप्राणी उपचार केंद्र ही संकल्पना पुढे आली, भूमिपूजन कोणीही केले तरीही उदघाटनाचा हक्क सुधीरभाऊंचाच होता आणि तसेच झाले याचे अत्यंत समाधान होत आहे.

पुणे वनवृत्तामध्ये अपंग,जखमी अवस्थेत आढळणाऱ्या वन्यप्राण्यांना दाखल करुन त्यांचेवर औषधोपचार करण्यासाठी पुणे हे मध्यवर्ती ठिकाण असल्याची बाब लक्षात घेता येथे वन्यप्राणी उपचार केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तत्कालीन अर्थमंत्री आणि वनमंत्री म्हणून सुधीर मुनगंटीवार यांनीच यासाठी पुढाकार घेतला होता हे विशेष.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)