राष्ट्रवादीत फूट! अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ #chandrapur

Bhairav Diwase
0
"या" नेत्यांनी घेतली मंत्री पदांची शपथ


दि. २ जुलैला शपथविधी राजभवनात पार पडला. अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची तर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, अदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांनी मंत्री पदांची शपथ घेतली.

अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला राजेश टोपे, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्या व्यतिरिक्त सर्वच नेते उपस्‍थित होते. त्यामुळे लगबगीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनीही देवगिरी गाठले होते. मात्र, सुप्रिया सुळे पोहचण्याआधीच राष्ट्रवादीचा खेळ खल्लास झाला होता. याबाबतची माहिती सुळे यांना कळताच त्यांनी देवगिरी सोडले.

देवगिरीवर हा फाटाफुटीचा खेळ सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जोरदार खलबते सुरू होती. देवगिरीवरील बंड यशस्वी झाल्याचा संदेश मिळताच राजभवनवर शपथविधीची तयारी करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)