बसस्थानकावरील पॉकेटमारीला बसणार लगाम, सीसीटीव्हीची राहणार नजर #chandrapur

Bhairav Diwase
0
शहरातील बस स्थानकात पोलीस अधीक्षक परदेशी यांच्या हस्ते पोलीस चौकीचे लोकार्पण 
चंद्रपूर:- चंद्रपुर शहरातील बस स्थानक परीसारात काही गुन्हेगार बस मध्ये चढतांना गर्दीचा फायदा घेवुन प्रवासी व महीलाचे पर्स, दागीने,मोबाईल, बँग चोरीच्या घटना घटत असल्याने गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी श्रीमती स्मिता सुतावने विभागीय नियत्रंण अधिकारी राज्य परीवहण विभाग चंद्रपुर, श्री मंगेश डांगे नियत्रंण अधिकारी राज्य परीवहण विभाग चंद्रपुर यांनी मोक्याची जागी जिथुन सर्व परीसर दिसेल अश्या ठिकाणी पोलीस चौकी साठी रुम उपलब्ध करुन साफसफाई व रंग रंगोटि करुन दिल्याने बस स्थानक परिसरात पोलीस चौकीचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

दिनांक 06/07/2023 रोजी श्री हेमंत गोवर्धन सहाय्यक वाहतुक निरीक्षक यांच्या उपस्थीती चंद्रपुरचे पोलीस अधिक्षक श्री रविद्रसिंग परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधीर नंदनवार, रामनगर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक श्री राजेश मुळे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक अमरदिप खाडे , सफौ गजानन डोईफोडे तसेंच पोलीस विभागीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते.

बस स्थानक परीसारात रामनगर पोलीसांनी लोकसहभागातुन 8 सि.सि.टि.व्ही कँमेरा बसवुन सतत लाऊट स्पीकरमध्ये अनाउन्समेन्ट करुन गर्दीच्या ठिकाणी दामीनी पथक , बिट अमलदार, चार्ली, गुन्हे शोध पथक अधिकारी /अमलदार सतत पेट्रोलींग करीत आहे. पोलीस स्टेशन रामनगर तर्फे नागरीकांना अहवान करण्यात येते की, बस स्थानक परीसारात एखादी सशंयीत व्यक्ती मिळुन आल्यास पोलीस स्टेशन रामनगर सपर्क क्र 07172-253200 व डायल 112 येथे माहीती द्यावी

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)