प्रकाशाच्या प्रतीक्षेत बंगाली कॅम्प वासीय
बीआरएस ने घेतली दखल
चंद्रपूर :- गडचांदूर शहरालगत असलेल्या बंगाली कॅम्प वार्ड क्रमांक 4 परिसरात राहणाऱ्या नागरिकांना मागील 40 - 50 वर्षांपासून वीज, नळ अश्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसून या वस्तीत 54 घरे असून साधारण 450 ते 500 नागरिक मोठ्या हाल अपेष्ठांचे जीवन ज्ञापन करीत आहेत
या गंभीर बाबीची माहिती बीआरएस नेते भूषण फुसे यांना कळताच त्यांनी या पीडित वार्डात भेट देत स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी नागरिकांनी आपली समस्या सांगताना म्हटले की सदर जमीनिवर आमचे वाडवडील आले माणिकगड सिमेंट कंपनी ची पायाभरणी पासून काम केलं कंपनी उभी केली आणि येथे स्थायी झाले, तेव्हापासूनच अंधारात आणि सर्व सुविधांपासून अलिप्त जीवन जगत आहोत. वस्तीत आतापर्यंत साप चावल्याने 10 ते 15 बालकांना आपला जीव गमवावा लागला, वाघ, जंगली डुक्कर आदी जंगली जनावरांची भीती आजही सतावते आहे, आणि माणिकगड कंपनी आम्हाला सर्व सुविधांपासून अलिप्त ठेवत आहे.
सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचेही स्थानिकांनी सांगितले.
भारत राष्ट्र समिती चे नेते भूषण फुसे यांनी सर्वांच्या समस्या जाणून घेतल्यावर या गंभीर विषयावर तोडगा निघावा म्हणून प्रशासनाने लक्ष द्यावे आणि स्थानिकांच्या समस्या तात्काळ सोडवाव्या अन्यथा बीआरएस पक्षा तर्फे तिव्र आंदोलन करू असा इशारा व आश्वासन फुसे यांनी स्थानिकांना दिला आणि या भारत देशाच्या नागरिकांना स्वातंत्र्य नंतरही मूलभूत सुविधा उपलब्ध कराव्या अशी भूमिका त्यांनी मांडली.
बीआर एस तर्फे लवकरच या पीडित नागरिकांची समस्या सोडवावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा भूषण फुसे यांनी दिला
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत