राजुरा:- शहरात दि.१३/०८/२०२३ रोजी वनोउधान गार्डन आसीफाबाद रोड राजुरा येथे आयोजीत बंजारा समाज बांधवाच्या सभेत ही कार्यकारिणी सर्वानुमते निवडण्यात आली सभेच्या अध्यक्षस्थानी श्री निवास जाधव तसेच गोवींद चव्हाण सर यांचे उपस्थीतीत सभेत खालील विषयावर चर्चा करून ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आले
(१) समीती गठीत करणे
२) सभेत अध्यक्ष / उपअध्यक्ष / सचीव / सहसचिव / कोषध्यक्ष यांची निवड सर्वानुमते करण्यात आली
३)आर्थीक व्यवहार करण्याचे अधिकार अध्यक्ष / सचीव / कोषध्यक्ष संयुक्त राहील असे ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आले.
४) समाज संस्थाना नाव देण्याबाबत
५) संत सेवालाल महाराज सेवा समीती राजुरा
६) संत शिरोमणी सेवालाल महाराज सेवा समीती राजुरा असे दोन नाव सुचवियात आले यापैकी संत शिरोमणी सेवालाल महाराज सेवा समीती राजुरा असे नाव देण्यात आले.
संत शिरोमणी सेवालाल महाराज सेवा समीती राजुरा च्या १७ सदस्य समीतीच्या अध्यक्षपदी नेहमी समाज कार्यात अग्रेसर असलेले श्री. नामदेव धनु जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
कार्यकारिणी समीती पुढीलप्रमाणे
नामदेव धनू जाधव (अध्यक्ष), तिरूपती प्रभाकर जाधव (उपाध्यक्ष), संतोष जितमल जाधव (सचिव), गणपत चव्हाण (सहसचिव), अनिल राठोड (कोषाध्यक्ष), लखन जाधव (सदस्य), निवास जाधव (सदस्य) बळीराम आडे ( सदस्य ), एन. के. जाधव (सदस्य), दत्ता चव्हाण (सदस्य), अंबादास राठोड ( सदस्य ) सदस्य माधव राठोड, संदिप आडे, शिवाजी चव्हाण, पंडित राठोड, हितेश राठोड, विलास चव्हाण
अशी सर्वानुमते समीती गठीत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. दयानंद पवार सर यांनी समीती स्थापण बाबत आपले मनोगत व्यक्त केले. तसेच श्री. पंडीत राठोड यांनी समाज कार्याला नेहमी सहकार्य राहील असे मत व्यक्त केले तसेच नवनियुक्त समीतीचे अध्यक्ष श्री. नामदेव जाधव यांनी राजुरा शहरात बंजारा समाजाचा विकास करण्यासाठी नेहमी सहकार्य राहील असे मत व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन श्री अनील राठोड यांनी केले तर आभार श्री. संतोष जाधव यांनी कार्यक्रमाला उपस्थीती सर्व गोर बंजारा बाधवांचे आभार व्यक्त केले.
सर्व नवनियुक्तांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस सुभेच्या देण्यात आल्या.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत