Top News

वीज कामगाराला मारहाण #chandrapur #ballarpur


बल्लारपूर:- वीज कामगार सुनील बाबूराव थेरे हे शिवाजी वॉर्डात वीज तारांना अडथळा निर्माण करणाऱ्या झाडाच्या फांद्या तोडताना गणेश ठाकरे नावाच्या व्यक्तीने सुनील थेरे यांना शिवीगाळ करून मारहाण केली. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पोलिसांच्या माहितीनुसार, वीज कामगार सुनील थेरे हे शिवाजी वॉर्डातील नाग मंदिराजवळ आपल्या सहकाऱ्यांसह वीज तारा मोकळ्या करण्यासाठी फांद्या तोडत होते. दरम्यान आरोपी गणेश ठाकरे हा येऊन 'माझ्या घराचा वायर ठीक करून द्या' म्हणत वाद करू लागला व वीज कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून मारहाण केली. थेरे यांनी या घटनेची माहिती आपल्या वरिष्ठांना देऊन बल्लारपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने