Top News

'त्या' चाकू हल्ल्यातील 3 विधिसंघर्षग्रस्त ताब्यात #chandrapur #Rajura


राजुरा:- काही दिवसांपूर्वी भरदिवसा झालेल्या गोळीबारात पुर्वशा सचिन डोहे यांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेची शाई वाळते न वाळते तोच दोन दिवसांपूर्वी रात्री पूर्व वैमनस्यातून विक्रांत महेश रामटेके याच्यावर चाकूने प्राणघातक करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी तीन विधिसंघर्ष बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

विक्रांत महेश रामटेके हे राजुरा येथील इंदिरानगर येथे राहते. ते आऊटडोअर फोटोग्राफीचा व्यवसाय करतात. लग्न समारंभाच्या फोटो शूटिंगच्या ऑर्डरसाठी मोबाइल कॉल करून हल्लेखोरांनी मॉल जवळील श्री चायवाला दुकानाजवळ बोलाविले आणि विक्रांत याच्या छातीवर चाकूने वार केला. अचानक झालेल्या हल्ल्याने घाबरून विक्रांत धावत मॉलमध्ये शिरला. संधी साधून तीनही हल्लेखोर पळून गेलेत. प्रणय नगराळे याने इतरांचे मदतीने विक्रांतला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथून विक्रांतला जिल्हा रुग्णालय नेले. सदर हल्ला हा पूर्व वैमनस्यातून झाला असल्याचे बोलले जात आहे. हल्लेखोरांवर गुन्हा नोंदविण्यात आला. असून अटक करण्यात आली.
ही कारवाई परिविक्षाधीन पोलिस अधिकारी विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनात एपीआय धर्मेंद्र जोशी, पीएसआय वडतकर, तपास अधिकारी नरेश उरकडे यांनी केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने