Top News

गुन्हेगारकडून दोन मोटार सायकल हस्तगत #chandrapur #LCB

स्थानिक गुन्हे शाखाची कारवाई

चंद्रपूर:- दिनांक ०६/०८/२०२३ रोजी फिर्यादी नामे अनिल वसंतराव निमकर वय ५४ वर्ष रा. वरोरा जि. चंद्रपुर यांनी पोस्टे वरोरा येथे लेखी रिपोर्ट दिली की, त्यांनी आपली मोटर सायकल होंडा ड्रिम निओ कंपनीची मोटर सायकल क्र. MH-34-AW-6442 अशी असलेली किंमत 30,000/- रू. ची घरासमोर उभी ठेवली असता कोणीतरी अज्ञात चोरानी चोरून नेली अश्या फिर्यादीच्या रिपोर्ट वरून पो. स्टे वरोरा अप. क्र. 632/2023 कलम 379 भादवी. अन्वये गुन्हा दाखल झाला.

मा. पोलीस अधीक्षक, चंद्रपुर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष निर्देश दिले कि वेगवेगळया पो. स्टे. च्या हददीत वाहने चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याने सदर घटनावर आळा घालण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक श्री. महेश कोंडावार यांनी विशेष पथक तयार करून त्यांना त्याबाबत निर्देश दिले होते. दि. ०६/०८/२०२३ रोजी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांचा मार्गदर्शनाखाली स्थागुशा पथक यांनी गोपनीय माहिती व्दारे रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे राजु दिपक वानखेडे वय ४२ वर्षे रा. गोपालपुरी, बालाजी वार्ड, चंद्रपूर यास ताब्यात घेवुन विचारपूस केली असता त्यांनी वरोरा, बल्लारशाह येथील मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली. व त्याचे कडून १) होंडा ड्रिम निओ कंपनीची मोटर सायकल क्र. MH-34-AW-6442 अशी असलेली किंमत 30,000/-रु. तसेच पोस्टे बल्लारशाह येथील २) होंडा एच एफ डिलक्स कंपनीची मो.सा.क. MH-37-S-7882 असा असलेली किंमत 30,000/- रू. अश्या दोन मोटरसायकल एकूण किंमत ६०,०००/- रू. चा माल आरोपीकडुन हस्तगत करण्यात आला.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधिक्षक सा. चंद्रपूर, मा. अपर पोलीस अधिक्षक सा. यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांचे नेतृत्वात सपोनी जितेन्द्र बोबडे, पोहवा नितिन साळवे ब.नं. २५४, पोहवा प्रकाश बलकी/६१८, पोहवा. सुभाष गोहोकार / ८१४ यांनी केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने