(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय बिंजवे, ब्रम्हपुरी
ब्रम्हपुरी:- ब्रह्मपुरी तालुक्यातील मांगली येथील हरिचंद्र केशव कुथे वय (५२) या शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाला असल्याची घटना दिनांक ५ ऑगस्ट २०२३ रोजी घडली आहे.
सध्या शेतीतील धान पिकाची पाहणी करण्यासाठी हरिचंद्र कुथे हे सायंकाळच्या सुमारास शेतावर गेले असता. अचानक विषारी सापाने त्यांना दंश केला. वेळीच त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय ब्रह्मपुरी येथे हलविण्यात येत असतांना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर ब्रह्मपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले . त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.