Top News

शहरात देहव्यापाराचा पर्दाफाश; ११ आरोपींना अटक #chandrapur #warora


वरोरा:- एका अल्पवयीन मुलीला दोन दलालांनी आर्थिक आमिष दाखवून देहव्यापाराचा धंदा सर्रासपणे चालविला होता. या प्रकरणात वरोडा पोलिसांनी अकरा जणांना अटक केली असल्याची माहिती येथील उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांनी काल दुपारी स्थानिक वरोरा पोलीस स्टेशनमध्ये घेतलेल्या पत्रपरिषदेत दिली.
प्राप्त माहितीनुसार शुक्रवारला दिनांक ३ आँगष्टला एका बेपत्ता मुलीच्या प्रकरणाचा तपास करीत असतांना उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांना या गंभीर प्रकरणाची माहिती मिळाली. ही धक्कादायक माहिती मिळताच चौकशीचे सूत्र चालविले असता एका अल्पवयीन गरीब मुलीकडून शहरातील एक महिला व एक पुरूष असे दोन एजंट देहव्यापार चालवित असल्याचे कळले. अधिक चौकशी केली असता यात या दोन एजंट सह नऊ जण आरोपी असल्याचे दिसून आले. पोलिसांनी याप्रकरणी अकरा जणांना अटक केली असून यातील एक आरोपी अगोदरच एका गुन्ह्यात अटकेत आहे. उर्वरित दहा जणांत या दोन एजंटचा समावेश आहे .

या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांच्या नेतृत्वात एक चौकशी समिती स्थापन केली असून यात दोन महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे. संबंधित गंभीर प्रकार काही महिण्यांपासून सुरु असल्याने प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या अकरा जणांसह ही संख्या वाढण्याची शक्यता उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांनी व्यक्त केली आहे..

शहरात अशाप्रकारचे रँकेट चालणे ही सामाजिक व्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय गंभीर बाब असून याचा सरळ प्रभाव शालेय विद्यार्थी तथा तरुण वर्गावर पडणे स्वाभाविक बाब आहे. सदर प्रकरण पोलीसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस येताच वरोरा पोलीस यंत्रणा पुढील कार्यवाहीसाठी सज्ज झाली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने