विद्युत प्रवाहाच्या झटक्याने ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू #chandrapur #chimur

Bhairav Diwase
0


चिमूर:- शंकरपूर येथील ग्रामपंचायत सदस्य संजय मनिराम नन्नावरे (वय 40 वर्षे) यांचा आर ओ प्लांट मध्ये विद्युत प्रवाहाच्या झटक्याने मृत्यू झाला आहे तर त्याच्या सोबत असलेला मुलगा गँभीर जखमी आहे. ही घटना शनिवारी दुपारी एक वाजता घडलेली आहे.

शंकरपूर येथे आरो फिल्टर प्लांट आहे हा प्लांट ग्रामपंचायत सदस्य संजय नन्नावरे दोन वर्षांपासून चालवित होते शनिवारी प्लांट चे सर्व कामे आटोपून अमन सुधाकर बारेकर (16) सोबत प्लांट बंद करण्यासाठी चॅनल गेट ला हात लावले असता तिथेच त्यांना विद्युत प्रवाहाचा झटका लागला त्यात दोघी खाली पडले लगेचच आजूबाजूचे लोक जमा झाले त्यानीच विद्युत प्रवाह बंद करून दोघांनाही शंकरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आणण्यात आले संजय हे गंभीर अवस्थेत असल्याने त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालय चिमूर येथे नेण्यात आले परंतु तिथेच त्यांचा मृत्यू झाला तर अमन बारेकर हे गंभीररित्या जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

संजय नन्नावरे हे वार्ड नंबर 3 चे ग्रामपंचायत सदस्य असून मागील दहा वर्षापासून ते ग्रामपंचायत सदस्य आहेत ते उच्च विद्याविभूषित असून अतिशय होतकरू व जनसामान्यांच्या सेवेला धावणारा युवक म्हणून त्याची ओळख होती त्यांच्या मागे आई, पत्नी व दोन मुलं असा परिवार आहे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून ग्रामीण रुग्णालय चिमूर येथे शवविच्छेदन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)