Top News

भद्रावतीत नवजात अर्भक आढळल्याने खळबळ #chandrapur #bhadrawati


भद्रावती:- शहरातील जंगल नाका परिसरात मुख्य रस्त्यावरील दुभाजकावर आज (दि.२२) सकाळी नवजात अर्भक मृतावस्थेत आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. मृत अर्भक हे पुरुष जातीचे आहे.

सदर घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी येवून ताब्यात घेतले. त्यानंतर पंचनामा करून मृत अर्भकाला पुढील तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. प्रत्यक्ष दर्शंनी दिलेल्या माहितीनुसार, एका कुत्र्याने हे मृत अर्भक तोंडात पकडून आणले होते. नागरिकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली असता कुत्र्याने हे अर्भक तेथेच टाकून पळ काढला.

यापूर्वीही शहरात नवजात अर्भक आढळल्याच्या दोन घटना घडल्या होत्या. चंडिका मंदिराजवळ एक जिवंत नवजात अर्भक सापडले होते. त्यानंतर नगरपालिकेच्या घंटा गाडीमध्ये एक मृत अर्भक आढळले होते. त्यानंतर आज पुन्हा नवजात अर्भक आढळून आले आहे. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने