चंद्रपूर जिल्ह्यात जुगार अड्ड्यावर धाड #chandrapur #bhadrawati

Bhairav Diwase

४ लाख ९७ हजारांचा मुद्देमाल जप्त; १० आरोपींविरोधात गुन्हा दाखल

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे टाकलेल्या धाडीत ४ लाख ९७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून १० जुगारी विरुद्ध जुगार कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,दि.२४ ऑगस्ट रोजी रात्री ८.४५ वाजताच्या दरम्यान भद्रावती पोलिस गस्त घालत असताना शहरातील सुमठाना वस्तीत एका घरात जुगार सुरु असल्याची गोपनीय माहिती मिळाली. सदर माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनात सदर घरी धाड टाकली असता एका बंद खोलीत १० इसम ५२ पत्त्यांवर पैशाची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळ खेळताना आढळून आले.

त्या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून डावावरील ३० हजार ६७० रुपये रोख, ८७ हजार रुपये किंमतीचे ७ भ्रमणध्वनी संच, ३ लाख ८० हजार रुपये किंमतीच्या ५ मोटार सायकल व २०० रुपये किंमतीचा ताश पत्ता असा एकूण ४ लाख ९७ हजार ८७० रुपयांचा मुद्देमाल पंचनामा कार्यवाही करून जप्त करण्यात आला.

या प्रकरणी भद्रावती पोलिस ठाण्यात सर्व आरोपींविरुद्ध अप.क्र.४७७/२०२४ महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम ४ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई भद्रावती पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बिपीन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल किटे, पोलिस अंमलदार शशांक बदामवार, अनुप, विश्वनाथ, निकेश, योगेश यांनी पार पाडली.