डुकराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी #chandrapur #pombhurna #accident

Bhairav Diwase
0
पोंभूर्णा:- तालुक्यातील पिपरी देशपांडे येथील शेतकरी आपल्या शेतात फवारणीचे काम करीत असताना पराठीत बसून असलेल्या डुकराने त्याच्यावर हल्ला चढवून गंभीर जखमी केले.मुर्लीधर भाऊजी आरेकर वय ४८ वर्ष रा.पिपरी देशपांडे असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे.

पोंभूर्णा तालुक्यातील पिपरी देशपांडे येथील शेतकरी मुर्लीधर आरेकर हे दि.२४ रोज गुरूवारला दुपारी दोनच्या सुमारास आपल्या शेतात पराठी पिकाला फवारणी करीत असतांना पराठीत बसून असलेल्या रानटी डुकराने हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केले.घटनेची माहिती मिळताच वनरक्षक सुरज मेश्राम यांनी घटनास्थळी पोहोचून त्याला तात्काळ उपचारासाठी पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)