पोंभूर्णा:- घनोटी तु.येथील ग्रामपंचायतीच्या शिवसेनेचे सरपंच योशोदा संदिप ठाकरे यांनी ठरल्या प्रमाणे अडीच - अडीच वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला
घनोटी तुकुम ग्रामपंचायतीत शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाची सत्ता असून ग्रामपंचायत एकूण नऊ सदस्य असून शिवसेना , काँग्रेस समर्थित ६ व भाजपा समर्थित ३ सदस्य संख्या असून सत्ता शिवसेनेची असून आपसात ठरल्या प्रमाणे अडीच - अडीच वर्षांची संधी देण्यासाठी म्हणून आज अडीच वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यावर यशोदा संदिप ठाकरे यांनी ठरल्याप्रमाणे मुदत संपल्यावर राजीनामा दिला.
यावेळी शिवसेना (उ.बा.ठा) चे तालुका प्रमुख आशिष कावटवार, माजी सरपंच कालिदास उईके, ग्रामपंचायत सदस्य पवन गेडाम,नरेश कोडापे,सुधाकर पेंदोर,साईनाथ बुरांडे,कमलेश घोडाम,आदी उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत