(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- आपल्या शेतात निंदन करायला गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला केल्याने ती महिला ठार होण्याची घटना भद्रावती तालुक्यातील टेकाडी(दी.) शेतशिवारात शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.
लक्ष्मीबाई रामराव कन्नाके (६०) रा. टेकाडी(दी.) असे मृत महिलेचे नाव असून ती आपल्या शेतात सुनेसोबत निंदनाचे काम करीत होती. दरम्यान सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास एका पट्टेदार वाघाने तिच्यावर हल्ला केला. त्यात ती गंभीर जखमी झाल्याने जागीच ठार झाली. आजुबाजुच्या लोकांनी आरडाओरड केल्यानंतर वाघाने लक्ष्मीबाईला जागीच सोडून जंगलाच्या दिशेने धुम ठोकली.
या घटनेची माहिती वनविभाग आणि पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी टेकाडीचे पोलिस पाटील सुभाष झाडे, वनरक्षक जनबंधू, गणेश गायकवाड आणि इतर गावकरी उपस्थित झाले होते.