राजराजेश्वर मंदिर ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौक पर्यंत रोडवरील लाईट तात्काळ लावा.

Bhairav Diwase
0

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी

पोंभुर्णा:- वार्ड नंबर 12 मधील पथदिवे राजराजेश्वर मंदिर तर क्रांतीज्योती सावित्री बाई फुले चौक पर्यंत मागील 3 दिवसा पासून लाईट बंद असल्यामुळे वार्ड नंबर 12 मध्ये अंधारात आहे. त्या मुळे रात्री घरी जाणारे नोकर वर्ग, लहान मुलाना, मुली/महिलांना, वृद्ध व्यक्तींना अंधारामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे
 अंधार मुळे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने याकडे गंभिरतेने लक्ष देऊन वार्ड नंबर 12 मधील बंद झालेली लाईट सुरु करून  नागरिकांचे भीतीचे वातावरण दूर करावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवेदनाद्वारे केली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आकाश तिरुपतीवार, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पवन बंकावार, व मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)