Top News

विवेकानंद माध्यमिक विद्यालय, भद्रावती येथे शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक #chandrapur #bhadrawati

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- स्थानिक विवेकानंद माध्यमिक विद्यालयात एक आगळीवेगळी निवडणूक पार पडली. विद्यार्थ्यांना लोकशाहीतुन होणाऱ्या देशातील निवडणूका शालेय जीवनातच समजाव्यात या हेतूने हा प्रयोग करण्यात आला.

सर्वात आधी विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना सदर निवडणूकीची रूपरेषा, त्यातील विविध टप्पे यांविषयी माहिती दिली. मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, पर्यावरण मंत्री, सहल मंत्री, क्रिडा मंत्री, आरोग्य मंत्री, सांस्कृतिक मंत्री या सात पदांसाठी इच्छुक विद्यार्थी उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज भरून घेण्यात आले.
उमेदवारांचा सर्व विद्यार्थ्यांना परिचय व्हावा, उमेदवारांनी आपण कोणत्या पदासाठी उभे आहोत, त्या पदाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या काय आहेत, आपण विजयी झाल्यावर काय करणार आहोत इ. बाबी मांडण्यासाठी एका प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले. या प्रचार सभेत सर्व उमेदवारांनी आपापली मते निर्भीडपणे मांडली व निवडून देण्याविषयी सर्व विद्यार्थ्यांना आग्रहाची विनंती केली.
दिनांक 01 ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष निवडणूक पार पडली.

निवडणूक पार पडल्यानंतर झालेल्या मतमोजणी मध्ये मुख्यमंत्री पदी प्रज्वल कुळमेथे, शिक्षण मंत्री पदी अनुश सिडाम, पर्यावरण मंत्री पदी दिव्या भोई, सहल मंत्री पदी आस्था बारतीने, क्रिडा मंत्री पदी वैष्णवी भोई, आरोग्य मंत्री पदी रतीका आस्वले, सांस्कृतिक मंत्री पदी वैदही चटकी हे विद्यार्थी विजयी झाले. निवडणूक अधिकारी म्हणून दयाकर मग्गीडवार सर, संजय आगलावे सर, बालाजी ताजने यांनी तर मतमोजणी अधिकारी म्हणून आशा मते मॅडम, तुकाराम पोफळे सर, पुरुषोत्तम श्रीरामे सर आणि निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रभारी मुख्याध्यापक अनिल धवस सर यांनी जबाबदारी पार पाडली.

निकाल घोषित झाल्यावर सर्व विजयी उमेदवाराचे पुष्पगुच्छ देऊन विद्यालयाचे वतीने अभिनंदन करण्यात आले. या प्रसंगी शाळेच्या परिसरातच एक छोटेखानी विजयी मिरवणूक काढण्यात आली. त्यात सर्व विजयी, पराभूत उमेदवारांसोबतच सर्व विद्यार्थी सामील झाले. अश्या तऱ्हेने खेळीमेळीचे वातावरणात शालेय मंत्रिमंडळ निवडणूक पार पडली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने