पोंभूर्णा येथे २५ रक्तदात्याने केले रक्तदान #chandrapur #pombhurna

Bhairav Diwase
पोंभूर्णा:- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मेरा मिट्टी मेरा देश अभियान अंतर्गत पंचायत समिती पोंभूर्णा येथे (दि.२२) रोज मंगळवारला आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात २५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.यावेळी उपस्थितांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वार्खेडे, गट विकास अधिकारी सुनीता मरस्कोले, सरपंच धनराज बुरांडे, भालचंद्र बोधलकर, तालूका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदेश मामिडवार, गटशिक्षण अधिकारी अर्चना मासिरकर यांची उपस्थिती होती.

रक्तदान सर्वश्रेष्ठ दान असे समजले जाते.शहरातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. अशा प्रसंगी तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.रक्तदान करण्यासाठी २५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.तसेच उपस्थित कर्मचारी पदाधिकारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

यावेळी सहाय्यक प्रशासन अधिकारी किरण वाढई, विस्तार अधिकारी अमरदिप खोडके,कनिष्ठ प्रशासन अधिकारी रश्मी पुरी,कनिष्ठ प्रशासन अधिकारी सुनिल कळस्कर,कृषी विस्तार अधिकारी अरूण वाकुडकर,विस्तार अधिकारी सांख्यिकी प्रणय गरमडे,कृषी अधिकारी नितीन ढवस, वरिष्ठ सहाय्यक उत्कर्ष तोडे,आरोग्य विस्तार अधिकारी देविदास कन्नाके, छाया पारशिवे,सहाय्यक कार्यक्रम अधिकारी हेमंत येरमे यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी,आरोग्य विभागाचे कर्मचारी,उमेद अभियानाचे कर्मचारी व महिला बचत गटांचे सदस्य यांनी प्रयत्न केले.