Top News

पोंभुर्णा येथे एसटी बस डेपो सुरु करण्यात पुढाकार घ्यावा #chandrapur #pombhurna


नगराध्यक्षा सुलभा पिपरे यांचे पालकमंत्री मुनगंटीवारांना निवेदन
पोंभूर्णा:- पोंभुर्णा तालुक्यात ३० ग्रामपंचायती व ७१ गावांचा समावेश आहे. त्यामानाने दळणवळणाची साधने कमी आहेत. पोंभूर्ण्यात एसटी डेपोला साजेसे अद्यावत बसस्थानक बनत आहे. मुल, पोंभूर्णा आणि गोंडपिपरी शहरांच्या परिसरातील गावांसाठी वेगळ्याने आता चंद्रपूर एसटी विभागात नवीन एसटी डेपो पोंभुर्णा इथे बनविण्यात यावे अशी मागणी नगराध्यक्षा सुलभा पिपरे यांनी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार यांचेकडे एका लेखी निवेदनाद्वारे आग्रहाची विनंती केली आहे.कारण चंद्रपूर डेपो मधून या परिसरातील ग्रामीणफेरीच्या नियोजनासाठी तथा चंद्रपूर डेपोत बसेस ठेवण्यासाठी तसेच मेंटनेन्ससाठी जागा कमी पडत असल्याचे ऐकीवात आहे.

चंद्रपूर डेपोला या परिसरातील शालेय तसेच ग्रामीण फेऱ्या चे नियोजन करण्यासाठी आता अडचण निर्माण होत आहे.ग्रामीण भागात एसटीचे प्रवाशी वाढत असल्याने आता वेगळ्याने या मुल,पोंभुर्णा,गोंडपिपरी भागातील ग्रामीण फेरी संचालित करण्यासाठी पोंभुर्णा सारख्या मध्यठिकाणीच एसटी बस डेपो बांधण्यात आले पाहिजे.पोंभुर्णा डेपो जर झाले तर मुल आणि गोंडपिपरी पॉईंट चे सुद्धा नियोजन एसटीला व्यवस्थितरित्या करता येईल.तसेच डेपो पोंभुर्णात बनल्यामुळे पोंभुर्णा आणि जवळच्या गावांचा विकास सुद्धा होणार असल्याचे सुलभा पिपरे यांचे म्हणणे आहे.
मुल आणि गोंडपिपरी ही शहरे महामार्गाला लागून असल्यामुळे ही शहरे विकसित असुन प्रवाशांसाठी वाहतुकीचे भरपूर साधन उपलब्ध आहेत.परंतु पोंभुर्णा शहर त्यामानाने खूप मागासलेले शहर आहे. त्यामुळे एसटी शिवाय दुसरे कोणतेही साधन इथे उपलब्ध नाहीत. पोंभुर्णा येथे एसटी बस डेपो झाल्यास या शहराच्या विकासात आणखी भर पडणार आहे.पोंभुर्णा डेपो बनल्यामुळे इथून सकाळी नागपूर साठी जानाळा-मुल-नागभीड मार्गे तसेच जुनोना-चंद्रपूर-वरोरा मार्गे एसटी बसेस उपलब्ध होतील. तसेच इथल्या प्रवाशांना चांदाफोर्ट ते गोंदिया या रेल्वे लाईन ची ट्रेन पकडण्यासाठी, टोलेवाही आणि केळझर रेल्वे स्टेशन वर, पोहचण्यासाठी व परतण्यासाठी वेळेवर बसेस उपलब्ध होतील.
पोंभुर्णा ते चामोर्शी मार्गे गडचिरोली,
पोंभुर्णा ते ब्रम्हपुरी मार्गे सावली,
पोंभुर्णा ते राजुरा मार्गे धाबा,
आणि आष्टी मार्गे अहेरी ह्या फेऱ्या सुद्धा सुरु होतील.हा मोठा फायदा येथील परिसरातील ग्रामस्थांना पोंभुर्णा येथे बस डेपो झाल्यामुळे होईल.
पोंभुर्णा डेपो झाल्यानंतर मुल आणि गोंडपिपरी या महामार्गावरील अचानकपणे बिघडनाऱ्या एसटी बसेस ची सुधारणा करण्यासाठी डेपोच्या  यांत्रिक कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी पोहचण्यास जास्त वेळ लागणार नाही.सध्या मुल परिसरातील बिघाडलेल्या बसेसचे काम चंद्रपूर आगार बघत आहे आणि गोंडपिपरी परीसर राजुरा आगार बघत आहे.या दोन्हीही ठिकाणी सध्या यांत्रिक कर्मचारी पोहचण्यासाठी दोन ते तीन तासहुन अधिकचा वेळ लागत आहे.म्हणून जर पोंभुर्णा डेपो झाले तर यांत्रिकांना या दोन्ही ठिकाणी  अर्ध्या तासात पोहचता येईल.त्यामुळे वेळ वाचेल आणि प्रवासांना जास्त वेळ वाट बघावी लागणार नाही. त्यामुळे पोंभुर्णा येथेच एसटी डेपो बनविने जास्त सोयीचे होणार आहे. या संपूर्ण परिस्थितीचा सर्व समावेशक विचार करून पोंभूर्णा येथेच एसटी बस डेपो बनविण्यात यावे, अशी मागणी पोंभूर्णा नगराध्यक्षा सुलभा पिपरे यांनी नामदार सुधीर मुनगंटीवार यांना दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे केली आहे. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने