अन्न व औषध प्रशासन कार्यालयाला भीषण आग #chandrapur

चंद्रपूर:- प्रशासकीय भवनातील तिसऱ्या मजल्यावरील उजव्या बाजूला असलेल्या अन्न व औषध प्रशासन भीषण आग लागली आहे. या आगीत कार्यालयातील वस्तू जळाल्याची प्राथमिक माहिती असून ही आग ऑफिसला कशामुळे लागली त्याचा तपास सुरू आहे. आग विजवण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दल आलेले असून आग विझवण्याचे काम सुरु आहे. आग नियंत्रणात आली आहे. हि आग पहाटे 3 वाजताच्या दरम्यान लागली असा अंदाज वर्तवला जात आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

प्रशासकीय भवनाच्या इमारतीत अनेक शासकीय कार्यालय असून या कार्यालयात नेहमीच विविध कामासाठी येणाऱ्या नागरिकांची वर्दळ असते.
अन्न व औषध कार्यालयाला नेमकी आग लागण्याचे कारण काय? प्राथमिक अंदाजानुसार शार्क सर्किट मुळे आग लागली असावी की इतर कारणे आहेत त्याच्या शोध घेणे आवश्यक आहे. या कार्यालयात पकडले गेलेल्या सुगंधी तंबाखू सारख्या पदार्थाची साठवणूक केली जात होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत