Top News

पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना मारहाण करणाऱ्या आमदारावर कार्यवाही करा #chandrapur


व्हॉईस ऑफ मीडिया चिमूरची मुख्यमंत्र्यांना निवेदना द्वारे मागणी

चिमूर:- जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना झालेल्या मारहानी बाबत आमदार किशोर पाटील यांचेवर कार्यवाही करण्याबाबत व्हॉईस ऑफ मीडिया चिमूरच्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी चिमूर यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
लोकप्रतिनिधींनी संयम बाळगून आपले कर्तव्य बजावणे अपेक्षित आहे. मात्र लोक्रप्रतिनिधींकडून पत्रकाराव हमला होणे ही हुकूमशाही आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना आमदार किशोर पाटील यांनी दूरध्वनी द्वारे अवाच्या शिवागाळी करून लोकप्रतिनिधी व त्यांच्या समर्थकांनी भर चौकात मारहाण केली. पत्रकार संदीप महाजन यांचेवर झालेला भ्याड हल्ला हा निंदनीय आहे. पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा व्हॉईस ऑफ मीडिया चिमूरच्या वतीने निषेध करण्यात आला. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आमदार किशोर पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी व दोषींना कठोर शासन करण्यात यावे. कार्यवाही न झाल्यास व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने कठोर आंदोलन करण्यात येईल. अशी मागणी चिमूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर घाडगे यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

यावेळी व्हॉईस ऑफ मीडिया चिमूर तालुका अध्यक्ष रामदास हेमके. तालुका सचिव भरत बंडे. जिल्हा कार्याध्यक्ष संपादक सुरेश डांगे. संपादक राम चीचपाले. जितेंद्र सहारे. जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रमोद राऊत. विलास कोराम. जिल्हा सहसरचिटणीस श्रीहरी सातपुते. योगेश सहारे. फिरोज पठाण. कलीम शेख. उमेश शंभरकर. रामदास ठुसे. योगेश अगडे व व्हॉईस ऑफ मीडियाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने