प्रशांत डांगे यांची विभागीय स्तरावरील मूल्यांकन समिती सदस्यपदी निवड #chandrapur #bramhapuri


🛣️
ब्रम्हपुरी:- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ महाराष्ट्र शासनाद्वारे हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रभर राबविली जात आहे.त्या अंतर्गत महाराष्ट्रातील बसस्थानकाचे मूल्यांकन करण्याकरिता विभागीय स्तरावर समिती गठित करण्यासाबंधीचा सूचना करण्यात आल्या होत्या या समितीत रा.प.च्या अधिकारी व्यतिरिक्त इतरही क्षेत्रातील मान्यवर घेण्याच्या सूचना नुसार दैनिक महासागरचे तालुका प्रतिनिधी पत्रकार तथा सामाजिक युवा कार्यकर्ता प्रशांत डांगे यांची महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियानाचे मूल्यांकन करण्यासाठी विभागीय स्तरावरील मूल्यांकन समितीमध्ये सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.त्यांच्या नियुक्ती बद्दल तालुक्यातील पत्रकार जीवन बागडे,नेताजी मेश्राम,विजय मुळे,विजय रामटेके,दिलीप शिनखेडे,शाम करंबे,शिवराज मालवी,दीपक पत्रे,दत्तात्रय दलाल, प्रवीण मेश्राम,अमर गाडगे,गोवर्धन दोनाडकर,राहुल भोयर,कृष्णा वैद्य, रवी चामलवार,संजय बिंजवे,रुपेश देशमुख,विनोद चौधरी,विनोद दोनाडकर तसेच इतर पत्रकार बंधूंनी तसेच मित्र परिवार तर्फे अभिनंदन करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत