प्रहार चंद्रपूर जिल्हा अध्यक्षपदी सतीश बिडकर यांची नियुक्ती

Bhairav Diwase
प्रहार दिव्यांग आंदोलन क्रांती च्या जिल्हाध्यक्षपदी पंकज माणूसमारे यांची नियुक्ती

कोरपना:- प्रहार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा दिव्यांग कल्याण विभाग प्रमुख यांच्या आदेशानुसार तसेच प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार जनशक्ती पक्षाच्या चंद्रपूर जिल्हा प्रमुखपदी सतीश बिडकर  तर प्रहारचे दिव्यांग संघटना जिल्हाध्यक्ष पंकज माणूसमारे यांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या जिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली.


प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चू भाऊ कडू हे २६ सप्टेंबर रोजी चंद्रपूर  दौऱ्यावर आले असताना त्यांच्या आदेशाने या निवडी करून नियुक्तीपत्र देण्यात आले. 

सतीश बिडकर पंकज माणूसमारे यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्व जिल्हाभरातून कौतुक करण्यात येत आहे. आगामी काळात प्रहार पक्षाचे व बच्चू भाऊ यांचे विचार रुजवण्यासाठी सतत काम करत राहणार. प्रश्न मार्गी लावण्या करिता कटी बद्ध राहील,  चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शहरी व ग्रामीण भागात पक्षाची मजबुत बांधणी करत बच्चू भाऊच्या विचारांना बळकटी देण्याचा निर्धार सतिश बिडकर यांच्याकडून करण्यात आला. यावेळी स्वीय सहाय्यक अमित वानखेडे , संजय गोमकाळे, परमेश्र्वर वाघमारे, अनुप राखुंडे, नितेश कोडपे व जिल्हाभरातील प्रहारचे पदाधिकारी उपस्थित होते