रात्रीचं जेवण केलं.... आधी पत्नी, नंतर पतीचा झाला मृत्यू #chandrapur #aheri

Bhairav Diwase
0


अहेरी:- अहेरी येथून 7 किमी अंतरावर असलेल्या महागाव बु. येथील टिंबर मार्ट व्यवसायिक शंकर तिरुजी कुंभारे (52) आणि त्यांच्या पत्नी विजया शंकर कुंभारे (45) यांचा नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा मृत्यू संशयास्पद असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.शंकर कुंभारे यांचा महागाव येथे टिंबर मार्टचा व्यवसाय आहे. ते आपल्या पत्नी व सुनेसह महागाव येथील घरात राहत होते. शुक्रवारी (दि.22) रात्री जेवण केल्यावर विजया कुंभारे यांची प्रकृती बिघडल्याने पती शंकर कुंभारे यांनी आलापल्ली येथील एका खाजगी रुग्णालयात नेले. मात्र, प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना चंद्रपूर महागाव येथील येथील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले.


शंकर कुंभारे यांनाही बरे वाटत नसल्याने त्यांनाही चंद्रपूर येथे भरती करण्यात आले. दोघांच्याही वेगवेगळ्या चाचण्या करण्यात आल्या. मात्र, एकाही चाचणीत समस्या दिसली नाही. प्रकृती चिंताजनक झाल्याने दोघांनाही नागपूर येथील रुग्णालयात भरती करण्यात आले. येथेही दोघांच्या चाचण्यांचा रिपोर्ट नॉर्मल निघाला. मात्र, उपचारादरम्यान अवघ्या चार दिवसांत मृत्यू झाला.शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर होईल स्पष्ट


नागपूर येथे शवविच्छेदन करून मृतदेह महागाव येथे आणण्यात येणार आहे. जेवणानंतर दोघांची प्रकृती विघडल्याने जेवणातून विषबाधा तर झाली नाही ना? किंवा अन्य काही कारणाने मृत्यू झाला का, याचे कारण शवविच्छेदन अहवाल आल्यावरनंतरच स्पष्ट होईल. मात्र, पत्नी-पत्नीच्या मृत्यूबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरु आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)