अखेर प्रश्न मार्गी लागला; तहानलेल्या 'या' 14 गावांना मिळणार पिण्याचे पाणी #chandrapur #pombhurna

Bhairav Diwase
0


चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील सहा तालुक्यातील 12 गावांच्या वाढत्या लोकसंख्येनुसार नळयोजना नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी संकटांचा सामना करावा लागत आहे.



जिल्हा परिषदेने जलजीवन मिशन कार्यक्रमातंर्गत नळयोजनेचा प्रस्ताव व निधीसाठी राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडे प्रलंबित होता. शुक्रवारी मंजुरीची मोहर उमटल्याने त्या तहानलेल्या गावांची समस्या दूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.



जिल्ह्यात मागील दहा वर्षांत पिण्याच्या पाण्यासाठी बऱ्याच सुविधा तयार झाल्या आहेत. मात्र, काही गावांत अजूनही लोकसंख्येला अनुरूप पिण्याच्या पाण्याची पुरेशी सुविधा नाही. चंद्रपूर, पोंभुर्णा, गोंडपिपरी, राजुरा, कोरपना, बल्लारपूर, जिवती आदी तालुक्यांत काही गावांत अडचणी आहेत. त्यामुळे जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जलजीवन मिशन कार्यक्रमातंर्गत 14 नळ पाणी पुरवठा योजनांच्या जादा दरांच्या टेंडर स्वीकृतीस कार्योत्तर मान्यता तसेच योजनेचा आराखडा व अंदाजपत्रकास सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता.



ही आहेत तहानलेली गावे


चालबर्डी कोंढा, चालबर्डी रयत, भामडेली, शिवणी चोर, वडाळा तुकूम (भद्रावती तालुका), बोर्डा झुल्लुरवार (पोंभुर्णा), चिंचोली नवीन पायली, सोनुर्ली रिठ, साखरवाही, पडोळी (चंद्रपूर), कुडेसावळी (गोंडपिपरी), कोठारी (गोंडपिपरी), कोठरी (गोंडपिपरी) काम सुरू होणार आहे.



तरच नळ योजना ग्रामपंचायतकडे


योजनेस सहमती दिलेल्या मूळ प्रशासकीय व सुधारीत तांत्रिक मान्यता देताना नमूद अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. योजना पूर्ण झाल्यावर ती संबंधित ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यात येईल, योजना प्रत्यक्षात पूर्ण झाल्यावर जि. प. कार्यकारी अभियंता व ग्रामपंचायतचे अधिकारी योजनेची संयुक्तपणे पाहणी करतील. दोष आढळल्यास कामाची सुधारणा करावी लागेल.



निधीचीही तरतूद


योजनांच्या जादा दरांच्या टेंडर स्वीकृतीला विचारात घेता जि. प. ग्रामीण पाणी पुरवठा कार्यकारी अभियंत्यांनीही सुधारित तांत्रिक मान्यता दिली. राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडून निधीसह अंतिम मंजुरीचा प्रस्ताव प्रलंबित होता. 20 ऑक्टोबरला निधीसह अंतिम मंजुरीचा शासन निर्णय जारी करण्यात आला. त्यामुळे 14 गावांतील नळ पाणी पुरवठा दर योजनेचा प्रश्न आता निकाली निघणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)