विद्यार्थी-युवक मित्रांनो शिक्षण व नोकरी बचाव समिती आयोजित जनआक्रोष मोर्चा मध्ये मोठ्या संख्येने सामील व्हा


युथ ऑफ चांदा(YOC) फाउंडेशन चे अध्यक्ष तथा गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य प्रा निलेश बेलखेडे यांचे आवाहन

चंद्रपूर:- दिनांक २०ऑक्टोंबर२०२३ ठिक दुपारी १२ वाजता दीक्षाभूमी डाॅ आंबेडकर काॅलेज, वरोरा नाका जवळ चंद्रपूर येथून शिक्षण न नोकरी बचाव समिती च्या वतीने जनआक्रोष मोर्चा चे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थी व शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी चा हा लढा असून शासनाने समितीच्या वतीने केलेल्या मागण्यांना मान्य करावे व नोकरी शिक्षणाचं कंत्राटीकरन आणि खाजगीकरण थांबवावे यासह विद्यार्थी व शिक्षकांच्या इतर काही मागण्यांना घेऊन हा जनआक्रोष मोर्चा होत असून कुठल्याही राजकीय पक्षाचा वैयक्तिक मोर्चा नसून विद्यार्थी युवक व शिक्षकांसह सर्व जनसामान्यांचा मोर्चा असून जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी, पालक वर्ग,बेरोजगार युवक, शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, वकील, अभियंते,सर्व जातिनिहाय संघटना, सामाजिक संघटना,राजकीय संघटना इत्यादी समाजातील घटक वर्गानी या जनआंदोलनात आवर्जून सहभागी व्हावे अशी विनंती शिक्षण व नोकरी बचाव समितीचे समन्वयक सदस्य सिनेट सदस्य प्रा निलेश बेलखेडे यांनी समितीच्या वतीने केले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत