श्री. शिवाजी महाविद्यालयाला न्याक समितीची भेट.

Bhairav Diwase
0
शिवाजी महाविद्यालयाला न्याक समितीची भेट.
माजी विद्यार्थीच्या देशभक्तीपर नृत्याने वेधले लक्ष.


राजुरा:- श्री शिवाजी महाविद्यालयाचा गुणात्मक दर्जा तपासण्याकरिता राष्ट्रीय प्रमाणीकरण व मूल्यांकन परिषद बेंगलोर येथील तीन सदस्यीय समितीने नुकतीच श्री शिवाजी महाविद्यालयाला प्रत्यक्ष भेट दिली. मध्यप्रदेश येथून आलेले डॉ. राजीव दुबे हे या समितीचे अध्यक्ष होते. आंध्रप्रदेशातील डॉ. रामकृष्णा चिंतला समितीचे समन्वयक म्हणून होते तर तामिळनाडू येथून आलेले डॉ. आर. सरवना सेल्वन यांचा समितीमध्ये सदस्य म्हणून समावेश होता. दि. 17 व 18 ऑक्टोबर या दोन दिवसांच्या भेटीदरम्यान या समितीने महाविद्यालयाशी संबंधित सर्व संचालक मंडळ, प्राचार्य, विध्यार्थी, पालक, माजी विध्यार्थी यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला. विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या माजी विध्यार्थीनी यावेळी उपस्थिती दर्शविली होती. सायंकाळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमा दरम्यान माजी विध्यार्थीनी देशभक्तीपर नृत्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. मूल्यांकन भेटी दरम्यान सादर केलेल्या माजी विध्यार्थीच्या नृत्यावर आनंद व्यक्त करीत त्यांनी केलेल्या कार्यावर समाधान व्यक्त केले. यावेळी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अविनाश दोरखंडे, सचिव बादल बेले, कार्याध्यक्ष प्रा. सुयोग साळवे, प्रदीप वासाडे, राहुल थोरात, गणेश दाते, शरद लांडे, देविदास कुईटे, रवी बुटले, भारत भोयर, राजू शेंडे, मनोज तेलिवार, अमोल राऊत, राधा विरमलवार, दीपाली शेंडे, गणेश चोथले, प्रज्वल बोबडे आदींसह आसिफ सय्यद, राजू गोखरे, सुरेश रागीट, धनंजय उमरे यांनी अथक परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)