"डाॅल्बी, डीजे, लेझर लाइट बंद करा हो", ज्येष्ठ नागरिकांची हाक #chandrapur #DJ

Bhairav Diwase
0

चंद्रपूर:- मागील काही वर्षांमध्ये सार्वजनिक उत्सव, मिरवणुकीमध्ये डाॅल्बी, डीजे आणि लेझर लाइटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी अनेक आजार निर्माण होत आहे. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांसह अन्य नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे डाॅल्बी, डीजे, लेसर लाइट बंद करण्याची मागणी येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने जिल्हाधिकारी विनय गौडा, पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्याकडे केली आहे. या संदर्भातील निवेदन देण्यात आले आहे. कर्णकर्कश डीजेंमुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या भेडसावू लागल्या आहेत. सोबतच ध्वनिप्रदूषणही मोठ्या प्रमाणात होत आहे. डीजेच्या आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, हृदयविकारग्रस्त रुग्ण, लहान मुले, गर्भवती महिला यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

त्यामुळे काहीही करा; पण डाॅल्बी, डीजे, लेसर लाईट त्वरित बंद करून नागरिकांचे आरोग्य जपा, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे. शिष्टमंडळात ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष महादेव पिंपळकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, सदस्य तसेच अन्य नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)