Click Here...👇👇👇

जनआक्रोश मोर्चा संबंधी कांग्रेसने संभ्रम निर्माण करू नये:- विजय मुसळे

Bhairav Diwase


जनआक्रोश मोर्चा युवक कांग्रेसतर्फे हायजॅक करण्याचा प्रयत्न?


चंद्रपूर:- शिक्षण व नोकरी बचाव समिती तर्फे 20 ऑक्टोबर ला शहरात भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र हा मोर्चा युवक कांग्रेसतर्फे हायजॅक करण्याचा प्रयत्न झाला असून शिक्षण व नोकरी बचाव समिती तर्फे शिवानी वडेट्टीवार यांनी समाजमाध्यमांवर टाकलेले व्हिडीओ डिलीट करावे अशी विनंती करण्यात आली आहे.


युवक कांग्रेसच्या प्रदेश पदाधिकारी शिवानी वडेट्टीवार यांनी समाज माध्यमांवर 20 ऑक्टोबर च्या मोर्च्याबाबत व्हिडीओ प्रसारित केले आहे. 


ही बाब शिक्षण व नोकरी बचाव समिती सदस्यांना कळताच त्यांनी यावर आक्षेप घेत सदर व्हिडीओ समाज माध्यमातून डिलीट करावा अशी मागणी करण्यात आली आहे. समन्वय समितीचे सदस्य विजय मुसळे यांनी वडेट्टीवार यांच्या या कृत्याबाबत आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली आहे. सदर मोर्चा हा युवक व विद्यार्थी वर्गाचा सरकारवर असलेला रोष आहे. सरकारने शासकीय नोकरी चे खासगीकरण व शिक्षणाचे कंत्राटीकरण करण्याच्या शासन निर्णय काढला आहे. त्यावर राज्यातील विद्यार्थी व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या बेरोजगारांचा तीव्र निषेध असून त्याचा विरोध करण्यासाठी 20 ऑक्टोबर ला चंद्रपुरात भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.